China Tesla India Investment : (म्हणे) ‘भारत हे ‘टेस्ला’साठी गुंतवणूक करण्याचे योग्य ठिकाण नाही !’ – चीनच्या विश्लेषकाचे विधान
चीनच्या विश्लेषकाचे भारतद्वेषी विधान
बीजिंग (चीन) – विजेवर चालणारी चारचाकी गाडी बनवणारे अमेरिकेतील प्रसिद्ध आस्थापन ‘टेस्ला’ भारतात गुंतवणूक करणार आहे. यावरून चीनने भारताच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केले आहे. चीन सरकारचे मुखपत्र ‘ग्लोबल टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत चिनी विश्लेषक चार्ल्स लिऊ यांनी ‘भारत हे ‘टेस्ला’साठी गुंतवणूक करण्याचे योग्य ठिकाण नाही’, असे विधान केले आहे. या विधानावरून त्यांच्यावर सामाजिक माध्यमांतून टीका होत आहे.
#Tesla should worry about its decision to build a factory in #India, why? Charles Liu, senior fellow at the Taihe Institute, at #GlobalArena:
-lack of supply chain and infrastructure
-lack of skilled engineers and workers
-negative business environment pic.twitter.com/bjkO5EAArd— Global Times (@globaltimesnews) April 11, 2024
चार्ल्स लिऊ पुढे म्हणाले की, टेस्लाला भारतात कारखाना उभारण्याची काळजी वाटायला हवी; कारण तिथे ना पुरवठा साखळी आहे ना पायाभूत सुविधा, ना सुशिक्षित अभियंते आहेत ना कामगार. व्यवसायासाठी वातावरणही चांगले नाही. चीनमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधा तिला भारतात मिळू शकणार नाहीत.
India is not the right place to invest for Tesla ! – Chinese analyst's anti-India statement
The fact that a company like Tesla is investing in India instead of China shows that Tesla does not trust China. So China's statement is unsurprising as it is currently hopping mad about… pic.twitter.com/DvUp6hRa3p
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 13, 2024
टेस्ला गुजरातमध्ये कारखाना उभारणार !
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार ‘टेस्ला’ आस्थापन भारतातील गुजरातमध्ये एक उत्पादन कारखाना उभारणार आहे. याबाबत टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क लवकरच पंतप्रधान मोदी यांची भेट घेणार आहेत.
संपादकीय भूमिकाटेस्लासारखे आस्थापन चीनऐवजी भारतात गुंतवणूक करत आहे, यावरून चीनविषयी या आस्थापनाला विश्वास नाही, हेच स्पष्ट होते. यामुळे चीनला मिरच्या झोंबणार, यात काय विशेष ? |