CRPF Fake Track Suit : बनावट ट्रॅक सूट विकल्याच्या प्रकरणी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अधिकार्याला पदावरून हटवले !
नोएडा (उत्तरप्रदेश) – देशातील सर्वांत मोठे केंद्रीय निमलष्करी दल असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाने नोएडा येथील ‘फोर्स ग्रुप सेंटर’मध्ये बनावट ट्रॅक सूट (व्यायाम करण्यासाठी किंवा खेळाडूंसाठीचा एक प्रकारचा पोशाख) विकल्याप्रकरणी ग्रुप सेंटरचे उपमहासंचालक हरविंदर सिंह कलश यांना हटवण्यात आले आहे. त्याच्यासह अनेक कर्मचार्यांनाही निलंबित करण्यात आले आहे. बनावट सूट विकल्याच्या प्रकरणाचे अन्वेषण वरिष्ठ अधिकार्यांकडे सोपवण्यात आले होते. अन्वेषणाच्या अहवालाच्या आधारे हरविंदर सिंह कलश यांना हटवण्याचे आदेश देण्यात आले.
संपादकीय भूमिकाकेवळ पदावरून हटवून काय उपयोग ? अशांवर गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात टाकले पाहिजे ! |