डोणगाव (सोलापूर) येथे धर्मशिक्षण वर्गातील धर्मप्रेमींनी रोखले छत्रपती शिवरायांचे विडंबन !

छत्रपती शिवरायांचे चित्र असलेली पिचकारी विकणार्‍या दुकानदाराचे केले प्रबोधन !

सोलापूर, १२ एप्रिल (वार्ता.) – डोणगाव येथे काही दुकानांमध्ये रंगपंचमीच्या दिवशी छत्रपती शिवरायांचे चित्र असलेली पिचकारी विक्रीसाठी ठेवली होती. गावातील धर्मशिक्षणवर्गातील काही धर्मप्रेमींना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी दुकानदारास ‘छत्रपती शिवरायांचे चित्र असलेली पिचकारी, तसेच हिंदु देवतांचे चित्र असलेले कोणतेही उत्पादन विक्रीसाठी उपलब्ध करू नये’, असे सांगून प्रबोधन केले. धर्मप्रेमींनी सर्व दुकानांमध्ये तशा पिचकार्‍या विक्रीसाठी उपलब्ध आहेत का ? हेही पाहिले. यात सर्वश्री सौरभ चव्हाण, विनायक मेटे, हरी कुंभार, करण काकडे, वैभव चराटे, शंकर शिंदे, महादेव काकडे, अर्जुन ननवरे, अमोगसिद्ध खजुरकर, सोमेश्वर भारती आदींनी सहभाग घेतला. (छत्रपती शिवरायांचा अवमान रोखण्यासाठी तत्पर धर्मप्रेमींचे अभिनंदन ! – संपादक)