साधकाने सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी सांगितलेल्या वाक्यातील चैतन्य आणि शक्ती अनुभवणे
‘एकदा सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी मला सांगितले, ‘‘मनात येणारे अनावश्यक विचार मनात आहेत; पण आपण मनापासून वेगळे आहोत. आपण आत्मरूप आहोत.’’ त्या वेळी मला ‘हे कसे अनुभवायचे ?’, ते कळत नव्हते.
एकदा मी ठाणे सेवाकेंद्रात नामजप करतांना माझ्या मनात अतिशय वेगाने विचार येत होते आणि माझे मन विचलित करत होते. त्यामुळे माझा नामजप होत नव्हता. तेव्हा सद्गुरु पिंगळेकाका यांनी सांगितलेले वाक्य मला आठवले आणि माझा त्रास न्यून झाला. मी संतांच्या वाक्यातील चैतन्य आणि शक्ती अनुभवली. त्यामुळे मला त्यांच्या चरणी वाटणारी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी पुढील पत्र पुढे लिहिले.
सद्गुरु काका, अनंत कोटी साष्टांग नमस्कार !
काही दिवसांपासून मला पुष्कळ त्रास होत होता. मला अनेक विचित्र दृश्ये दिसत होती. ‘स्मशानात मी कुणाचे तरी अंत्यसंस्कार करत आहे, कुणाचा तरी मृत्यू होणार आहे’, अशी दृश्ये मला दिसत होती.
आज ठाणे सेवाकेंद्रात जप करतांना मी तुमचे स्मरण केले आणि ‘शरीर, मन, बुद्धी इसके परे हू मैं ।’, असा विचार माझ्या मनात आला. काही वेळाने ‘मी सच्चिदानंद परमात्मा याचा अंश आहे, जो शरीर, मन आणि बुद्धी यांकडे साक्षीभावाने बघत आहे’, असे मला वाटू लागले. या विचाराने माझे सगळे त्रास न्यून होत गेले. दृश्य आणि विचार हे स्वप्नासारखे आहेत. स्वप्न पडतांना ‘सगळे सत्य आहे’, असे वाटते; पण जाग आल्यावर स्वप्न नष्ट होते. ‘दृश्य आणि विचार हे अशाश्वत अन् क्षणिक आहेत’, याचा मला बोध झाला. केवळ आत्मरूपात असणारे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव शाश्वत आहेत. तेच माझ्यात आणि मी त्यांच्यात आहे. तुमच्यामुळे या ज्ञानाचा मला बोध झाला. त्याबद्दल कोटीशः कृतज्ञता.’
– श्री. देवेन पाटील, देहली सेवाकेंद्र (५.५.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |