सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी दिलेल्या नामजपादी उपायांनी शारीरिक त्रास आणि त्याविषयी वाटणारी भीती उणावणे
‘मागील चार मासांपासून मला शौचाला जाण्याच्या ठिकाणी आणि लघवीच्या जागेला पुष्कळ शारीरिक त्रास होत होते. त्यामुळे मला माझ्या प्रकृतीविषयी पुष्कळ भीती आणि काळजी वाटू लागली. तेव्हा मी ‘आधुनिक वैद्यांकडे जावे’, असा विचार केला. त्याच दिवशी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना नामजपादी उपाय विचारण्यासाठी मला होणारे त्रास कागदावर लिहून दिले. तेव्हा सद्गुरु गाडगीळकाकांनी मला ‘श्री गणेशाय नमः । श्री गणेशाय नमः । ॐ नमो भगवते वासुदेवाय । ॐ नमः शिवाय । ॐ नमः शिवाय ।’, असा नामजप करायला सांगितला. मी २ – ३ दिवस १ घंटा हा नामजप केला, तसेच वैद्यांची औषधेही घेतली. वैद्यांनी तपासल्यानंतर ते मला म्हणाले, ‘‘वयोमानानुसार असा त्रास होतो. काळजी करण्याचे काही कारण नाही.’’ हे ऐकून मला परात्पर गुरु डॉक्टर आणि सद्गुरु गाडगीळकाका यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली. गुरुदेवांच्या कृपेनेच मी या त्रासातून लवकर ठीक झाले आहे.’
– एक साधिका, फोंडा, गोवा. (१७.८.२०२३ )
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |