आताचे महाराज खरे वारसदार नसून ते दत्तक आले आहेत ! – संजय मंडलिक, खासदार, शिवसेना
कोल्हापूर – आताचे शाहू महाराज हे कोल्हापूरचे आहेत का ? ते खरे वारसदार नाहीत, ते दत्तक आले आहेत. तुम्ही-आम्ही आणि कोल्हापूरची जनताच खरी छत्रपती शाहू महाराज यांची वारसदार आहे.
‘मल्लाला हात लावायचा नाही, मल्लाला टांगच मारायची नाही मग ती कुस्ती कशी होणार ?’, असा प्रश्न शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी उपस्थित केला आहे. चंदगड तालुक्यातील नेसरी येथे झालेल्या सभेत ते बोलत होते.