पुणे येथे मतदार जागृतीच्या फलकावर ‘इन्कलाब झिंदाबाद’, ‘नोटा’ असे लिहले !
‘गोखले संस्थे’तील प्रकार !
पुणे – देशातील सर्वच राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापू लागले आहे. त्यातच पुणे येथील ‘गोखले इन्स्टीट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स’ या संस्थेत मतदानाविषयी जागृती करण्यासाठी लावण्यात आलेल्या फलकाचे विद्रुपीकरण करून त्यावर ‘इन्कलाब झिंदाबाद’ ‘मतदान करतांना नोटाचा वापर करा’, असे लिहिण्यात आले होते. निवडणुकीत उभे राहिलेल्या मतदारांपैकी कुणालाही मत द्यायचे नसल्यास ‘नोटा’ म्हणजे वरीलपैकी कुणीही नाही, हा पर्याय वापरला जातो. ‘हा प्रकार कुणी आणि का केला ?’, याविषयी अद्याप माहिती प्राप्त झालेली नाही. या प्रकाराची माहिती मिळताच निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने संस्थेमध्ये जाऊन त्याची पहाणी केली आहे.
सौजन्य Pune Darpan News
फलकाची छेडछाड करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’चे प्रदेशमंत्री अनिल ठोंबरे यांनी केली. आंदोलन करण्याची चेतावणीही देण्यात आली. या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्टीकरण ‘गोखले संस्थे’च्या प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
संपादकीय भूमिकाभारतात राबवण्यात येणारी लोकशाही प्रणाली साम्यवाद्यांना मान्य नाही. ज्या प्रमाणे जे.एन्.यू. आणि अन्य शैक्षणिक संस्था यांमध्ये साम्यवाद्यांचा शिरकाव झाला आहे, तसा तो ‘गोखले संस्थे’तही झाला नाही ना, याचा शोध घेणे आवश्यक ! |