SC Slams Private Hospitals : अनुदानित खासगी रुग्णालयांकडून गरिबांसाठी खाटा राखीव ठेवण्याच्या आश्वासनाला हरताळ !
सर्वोच्च न्यायालयाने खासगी रुग्णालयांना फटकारले !
नवी देहली – देशभरातील काही खासगी रुग्णालये सरकारी अनुदानावर भूमी घेतात. त्यावर रुग्णालये बांधतात, तसेच या रुग्णालयात २५ टक्के खाटा गरीब जनतेसाठी राखीव ठेवण्याचे आश्वासन देतात; मात्र हे आश्वासन कधीच पूर्ण करत नाहीत. हे अनेकदा आम्ही बघितले आहे, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने खासगी रुग्णालयांना फटकारले. नेत्ररोगांवरील उपचारांसाठी देशभरात एकसमान दर निश्चित करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणार्या ‘ऑल इंडिया ऑप्थॅल्मोलॉजिकल सोसायटी’च्या याचिकेवर सुनावणी करतांना न्यायालयाने वरील टीप्पणी केली. तज्ञांचे दर आणि सामान्य डॉक्टरांचे दर सारखे असू शकत नाहीत, असे ‘सोसायटी’कडून सांगण्यात आले आहे.
संपादकीय भूमिकान्यायालयाने अशा रुग्णालयांना केवळ फटकारून सोडू नये, तर त्यांच्याकडून आश्वासनांची आणि नियमांची पूर्ती व्हावी, यासाठी कठोर धोरण राबवण्याचा आदेश द्यावा, असेच सामान्य जनतेला वाटते ! |