Salwan Momika : नॉर्वेमधील वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या यांनी माझ्या मृत्यूची खोटी बातमी प्रकाशित केली ! – सालवान मोमिका

कुराण जाळणारे सालवान मोमिका जिवंत !

कुराण जाळणारे सालवान मोमिका

ओस्लो (नॉर्वे) – मी जिवंत आहे. नॉर्वेमधील वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या यांनी माझ्या मृत्यूची खोटी बातमी प्रकाशित केली, असे इस्लामचे कट्टर टीकाकार आणि कुराण जाळणारे सालवान मोमिका यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, ‘‘इस्लामवर शंका घेणार्‍या किंवा टीका करणार्‍या प्रत्येकाला घाबरवणे, हे अशा प्रसारमाध्यमांचे ध्येय आहे. त्यांच्या अशा बातम्यांना मी घाबरणार नाही. नॉर्वेच्या अधिकार्‍यांनी माझ्यावर अन्याय केला असला, तरीही मी शरणागती पत्करणार नाही. मी जिथे उतरलो होतो तेथून पोलिसांनी मला लगेच अटक केली आणि माझा भ्रमणभाष काढून घेतला. त्यांनी मला कुणाशीही संवाद साधू दिला नाही. त्यांनी मला न्यायालयात उभे केले. न्यायालयाने निर्णय देतांना म्हटले, ‘तुम्ही (मोमिका यांनी) नॉर्वेच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण केल्यामुळे तुम्हाला कह्यात घेण्यात आले आहे.’ मी त्यांना सांगितले की, तुमचा कारावास किंवा तुमचे न्यायालय मला घाबरवू शकत नाही. इस्लामने अनेक देशांवर नियंत्रण मिळवल्याने आणि ते तेथील मुलींवर बलात्कार करत असल्याने तुम्ही आनंदी आहात असे दिसते.’’ त्यानंतर पोलिसांनी मला न्यायालयाबाहेर नेले. त्यांनी मला मानवी हक्क संघटना आणि प्रसारमाध्यमे यांच्यापासून दूर असलेल्या एका गुप्त कारागृहात मला डांबून ठेवले.