विद्यार्थी जीवनात प्रगती करण्यासाठी धर्माचा उपयोग कसा होऊ शकेल ?
प.पू. स्वामी वरदानंद भारती यांचे धर्माविषयी अमूल्य मार्गदर्शन असणारी लेखमाला !
ब्रह्मचर्याश्रमाचे आचारधर्म हे निरामय, निरोगी, सुदृढ बलसंपन्न शरीर आणि विकसित, तेजस्वी मन-बुद्धी घडवण्यासाठी जे जे आवश्यक त्या सर्वांचा यामध्ये समावेश आहे.
या आश्रमाच्या धर्मांतर्गत सांगितलेल्या उपासना या विद्यार्थ्यांची ज्ञान ग्रहण आणि धारण करण्याची क्षमता वाढवण्यास अतिशय उपयुक्त आहेत. यामुळे संस्कारित झालेल्या ज्ञानाची योग्य अभिव्यक्ती करण्याचे सामर्थ्यसुद्धा वाढते.
आज प्रायः खरे विद्येचे, ज्ञानाचे अर्थी अपेक्षा असणारे किती ? हा एक संशोधनाचा विषय आहे. बहुधा यामध्ये परीक्षार्थी आणि पोटार्थीच अधिक आढळतात. या आश्रम धर्माच्या प्रामाणिक आचरणाने त्यांनाही मोठा लाभ होतो, असा प्रयोगसिद्ध अनुभव आहे. विद्यार्थ्यांची स्मृती, मेधा, धारणा, प्रज्ञा अशा विविधांगी बुद्धीमत्तेमध्ये वाढ होते. ज्ञान जाणून घेण्याची प्रक्रिया सोपी होते.
– प.पू. स्वामी वरदानंद भारती (वर्ष १९९८)
(साभार : ग्रंथ ‘जिज्ञासा’, श्रीवरदानंद प्रतिष्ठान, श्री क्षेत्र पंढरपूर)