लव्ह जिहाद पसरवण्यासाठी गावांकडे धर्मांधांचा जोर ! – विक्रम पावसकर, हिंदू एकता आंदोलन, सातारा जिल्हाध्यक्ष

  • हिंदू एकता आंदोलनाचा सांगली येथे ‘हिंदु मेळावा’ पार पडला !

  • मातंग वस्तीतील धर्मांतर, तसेच लव्ह जिहाद यांना रोखण्यासाठी तळमळीने पुढाकार घेणार्‍या हिंदू एकता आंदोलनाचे अभिनंदन !

श्री. विक्रम पावसकर

सांगली – शहरी भागात जागृती झाल्याने धर्मांध संघटना ‘लव्ह जिहाद’ ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर पसरवण्यासाठी १० वर्षे वयापासूनच्या सर्वच मुली आणि महिला यांना लक्ष्य करीत आहेत. समस्त हिंदु परिवारांनी आपल्या माय-भगिनींना गावोगावी जाऊन याविषयी जागृत करणे आवश्यक आहे. अन्यथा पुढील काळात आपल्याच माय-भगिनींना सुरक्षितपणे वावरणेसुद्धा कठीण होईल. ‘जो हिंदु , तोच आपला बंधू’, भले तो कुठल्याही संघटनेचा असो. भगवा ध्वज आणि हिंदु राष्ट्र हेच हिंदू एकता आंदोलनाचे ध्येय असून भारत हिंदु राष्ट्र होण्यासाठी सतत प्रयत्नशील राहू. यासाठी प्रथम ‘सर्वधर्मसमभाव’ नावाची कीड ठेचून काढली पाहिजे. लोकसंख्या नियंत्रण कायदा झालाच पाहिजे, असे सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष श्री. विक्रम पावसकर यांनी सांगितले. येथील कच्छी जैन समाज भवनात ‘हिंदू एकता आंदोलना’च्या वतीने गुढीपाडव्याच्या निमित्त ‘हिंदु मेळावा’ घेण्यात आला.

व्यासपिठावरील उपस्थित मान्यवर

या मेळाव्याला मार्गदर्शन करतांना ‘हिंदू एकता आंदोलना’चे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार श्री. नितीनराजे शिंदे म्हणाले ‘‘सांगलीत शांतीनगर येथे बहुतांश मूळ मातंग हिंदु असलेल्या सर्वच कुटुंबांना धर्मांतरित करण्यात आले असून धर्मांतरित झालेले मातंगी उर्वरित हिंदु मातंग असलेल्या १५ ते २० कुटुंबांना धमक्या देत आहेत आणि त्रास देत आहेत. या शांतीनगरमधील श्री मरगूबाई मंदिराचा जिर्णोद्धार करून तेथे सर्व धार्मिक उपक्रम आम्ही पुन्हा एकदा चालू केले आहेत. येथील शंभर फुटी रस्त्यावरील पाकीजा मशिदीच्या भागात मोठ्या प्रमाणावर लँड जिहाद चालू असून ‘पारंपरिक महार वतन’ असलेली ही ‘वर्ग-२’ची ३७ एकर भूमी धर्मांधांनी अवैधरित्या बळकावली आहे. या भागातील बौद्ध आणि हिंदु कुटुंबियांना जागा सोडण्यासाठी धमकावले जात आहे. प्रशासन आणि पोलीस यांच्या विरोधाला धुडकावून आम्ही आजचा हा ‘हिंदु मेळावा’ घेतला आहे. यापुढे प्रत्येक वर्षी गुढीपाडव्याला आम्ही ‘हिंदु मेळावा’ घेणार आहोत. संभाजीनगर येथील औरंगजेबाच्या थडग्यासमोर ‘क्रूरकर्मा औरंगजेबाचे थडगे’ असा फलक हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने आम्ही लवकरच लावणार आहोत. धर्मांधांच्या कोणत्याही धमक्यांना भीक न घालता ‘हिंदू एकता आंदोलन’ स्वत:च्या ध्येयाकडे वाटचाल करीत राहील, अशी ग्वाही मी समस्त हिंदु परिवाराला देत आहे.

माजी आमदार श्री. नितीनराजे शिंदे

प्रमुख उपस्थिती

कार्याध्यक्ष श्री. विनायक पावसकर, सर्वश्री संजय जाधव, विष्णुपंत पाटील, श्रीकांत शिंदे, वि.द. बर्वे, उद्योजक मनोहर सारडा, पांडुरंग चोरगे, गजानन तोडकर, आप्पा झांबरे, वीर कुदळे, चंद्रकांत जिरंगे, प्रसाद होमकर, मनोहर साळुंखे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष दीपक देसाई, विजय टोणे, ‘सावरकर प्रतिष्ठान’चे श्री. विजय नामजोशी, नगरसेविका सौ. उर्मिला बेलवलकर आणि अधिवक्त्या सौ. स्वाती शिंदे, सौ. नीता केळकर, रा.स्व. संघाचे श्री. विलास चौथाई, हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष देसाई

उपस्थित मान्यवरांसह हिंदुत्वनिष्ठ आणि धर्माभिमानी

 क्षणचित्रे

१. वन्दे मातरम आणि ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीतांनी मेळाव्याला प्रारंभ करण्यात आला.

२. सातारा, कराड, कोल्हापूर आणि सांगली येथील शेकडो कार्यकर्ते अन् हिंदुत्वनिष्ठ या मेळाव्यात उपस्थित होते.

३. ‘ज्याच्या कपाळी टिळा, त्याच्याशीच व्यवहार पाळा’, अशी सामूहिक शपथ उपस्थितांनी घेतली.