प्रचारसेवा करतांना पुणे येथील श्रीमती माधवी चतुर्भुज यांनी गुरुसेवेतील अनुभवलेला आनंद !
१. साधनेमुळे मन सकारात्मक आणि आनंदी असणे
‘माझ्या मनामध्ये नकारात्मक विचार नसतात. त्यामुळे मला सतत सकारात्मकता आणि आनंद अनुभवता येतो. ‘मी साधनेसाठी अजून कसे प्रयत्न करू ?’, असे सेवा आणि सत् यांचेच विचार माझ्या मनात असतात.
२. मनाची व्यापकता वाढणे
‘मला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील सर्व मुली माझ्या मुलीसारख्याच (कु. मधुरा चतुर्भुजसारख्या) आहेत’, असे वाटून आनंद होतो.
३. शारीरिक स्थिती चांगली नसतांनाही प्रसारातील सेवा गुरुकृपेने करता येणे
‘माझ्या कंबरेचे शस्त्रकर्म झाले आहे. त्यामुळे माझी शारीरिक स्थिती चांगली नसतांनाही गुरुदेव सूक्ष्मातून माझ्या समवेत असल्यामुळे मला दुचाकी सहजतेने चालवता येते. त्यामुळे दुचाकी वापरून मला प्रचारसेवेला जाता येते. गुरुकृपेमुळे माझ्या सेवेत खंड न पडता मला तळमळीने आणि झोकून देऊन सेवा करता येते. मला पुणे येथे प्रचारसेवा करतांना साहित्य वितरण, विज्ञापने आणणे आणि अन्य उपक्रम या सेवा करता येतात.
४. समाजातील लोकांचा साधकांविषयी अनुभवलेला भाव !
समाजातील लोक आम्हाला म्हणतात, ‘तुम्ही (सनातनचे साधक) चांगले कार्य करता.’ आम्ही कपडे खरेदीला दुकानात गेल्यावर ते दुकानदार म्हणतात, ‘‘तुम्ही (साधक) दुकानात आला की, आम्हाला लाभ होतो. तुम्ही पूर्ण दुकानात फिरून या.’’
५. साधनेमुळे वास्तूमध्ये झालेले पालट !
अ. आमच्या घरामध्ये लावलेले भगवान श्रीकृष्णाचे चित्र आणि श्रीकृष्णाची वचने पूर्ण निर्गुण झाली आहेत.
आ. आमच्या घरातील लादी गुळगुळीत आणि पारदर्शक झाली आहे.
इ. घरातील सतरंजीवर ३ – ४ ‘ॐ’ उमटले आहेत.
ई. घरी येणार्या सर्वांना घरात शांत वाटते. आम्ही त्यांना नेहमी सांगतो, ‘आम्ही साधना करतो. हे घर म्हणजे माझ्या गुरुदेवांचा आश्रम आहे. येथे त्यांचे अस्तित्व आहे.’
‘हे गुरुदेवा, हे सर्वकाही आपल्या कृपेने अनुभवता येत आहे. कोटीशः कृतज्ञता !’
– श्रीमती माधवी मोहन चतुर्भुज (वय ६२ वर्षे), पुणे, (९.२.२०२४)
|