डोंबिवली (जिल्हा ठाणे) येेथे विद्यार्थ्यांना अमली पदार्थ विकणार्या मुसलमान महिलेला अटक !
साडे पाच लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त
डोंबिवली – शालेय आणि महाविद्यालयीन मुला-मुलींना अमली पदार्थ विकणार्या सलमा शेख (वय ६५ वर्षे) हिला पोलिसांनी रंगेहात अटक केली. तिच्याकडून साडे पाच लाख रुपयांचा मार्फीन हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला. तिला पकडण्यासाठी पोलिसांनी तिच्यावर १ महिना पाळत ठेवली होती.
वर्ष २०१५ मध्येे तिला एका प्रकरणात अटक करण्यात आली होती. कारागृहातून सुटल्यावर तिने पुन्हा अमली पदार्थ विकण्याचा धंदा चालू केला. ती कुणाकडून अमली पदार्थ विकत घेत होती, याचा शोध पोलीस घेत आहेत.
संपादकीय भूमिका
|