Meerut Namaz On The Road : मेरठ (उत्तरप्रदेश) येथील शाही ईदगाहजवळील रस्त्यावर नमाजपठण करण्यास पोलिसांनी केला विरोध

मुसलमानांनी दिल्या ‘अल्लाहू अकबर’च्या  (‘अल्ला महान आहे’च्या) घोषणा !

मेरठ (उत्तरप्रदेश) – येथील शाही ईदगाहमध्ये सकाळी ८.१५ वाजता नमाजपठण  करण्यात आले. या वेळी सहस्रो मुसलमान उपस्थित होते; मात्र लोकांची संख्या वाढल्याने त्यांनी रस्त्यावरच नमाजपठण करण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी त्यांना विरोध केला.

मेरठमधील पोलीस आणि प्रशासन यांनी आधीच ‘ईदच्या निमित्ताने शहरात कोणत्याही ठिकाणी नमाजपठण करू नये’, अशा सूचना दिल्या होत्या. असे असतांनाही येथे मुसलमानांनी रस्त्यावर नमाजपठण करण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांनी पोलिसांशी वाद घातला. तसेच ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा देण्यास आरंभ केला. पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांना यश आले नाही आणि ते इतर ईदगाह आणि मशीद येथे जाऊन नमाजपठण करण्यासाठी गेले.

संपादकीय भूमिका

रस्त्यावर नमाजपठण करणे अयोग्य असतांना तसा प्रयत्न करणार्‍यांवर कठोर कारवाई केली, तरच अशा घटनांना पायबंद घालता येईल !