Modi Greeted Maldives President : पंतप्रधान मोदी यांच्याकडून मालदीवच्या राष्ट्रपतींना ईदच्या शुभेच्छा !
नवी देहली – मालदीवसमवेत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालदीवचे राष्ट्रपती महंमद मुइज्जू यांना ११ एप्रिलला ईदनिमित्त शुभेच्छा संदेश पाठवला आहे.
On the auspicious occasion of Eid-Al-Fitr, Hon'ble Prime Minister of India 🇮🇳 @NarendraModi extended warm greetings to His Excellency President of Maldives Dr. @MMuizzu, the Government & the people of the Republic of Maldives 🇲🇻.
The full PR is here: 👇@IndianDiplomacy pic.twitter.com/6TGwGKDalc
— India in Maldives (@HCIMaldives) April 10, 2024
पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, ईदचा हा विशेष सण जगभरातील लोकांना करुणा, बंधुता आणि एकता यांची आठवण करून देतो. शांततापूर्ण आणि सर्वसमावेशक जगासाठी हे आवश्यक आहे. भारत आणि मालदीव यांमधील सामायिक संस्कृती आणि सभ्यता यातूनच दोन्ही देश दीर्घकाळापासून एकमेकांशी जोडले गेले आहेत.