धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलीदानाचे स्मरण करून हिंदूंनी संघटित व्हावे ! – ह.भ.प. अनिल महाराज देवळेकर
धर्मवीर बलीदानमास निमित्ताने भोर (पुणे) येथील मूक पदयात्रा !
भोर (जिल्हा पुणे), १० एप्रिल (वार्ता.) – आज सर्व हिंदू संघटित झाले, तरच धर्मरक्षण होईल, यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलीदानाचे स्मरण करून हिंदु धर्माचे रक्षण करण्यासाठी सर्व हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, भोर विभागाच्या वतीने धर्मवीर बलीदान मास निमित्ताने ८ एप्रिलला मूक पदयात्रेचे आयोजन केलेले होते. या वेळी शिवव्याख्याते ह.भ.प. अनिल महाराज देवळेकर उपस्थित धारकरी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते. मूक पदयात्रेचा आरंभ भोर बसस्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिवादन करून झाला आणि शिवतीर्थ चौपाटी येथे अंत्ययात्रा काढून समारोप करण्यात आला. या वेळी मोठ्या संख्येने शेकडो धारकरी उपस्थित होते.