दौंड (पुणे) पोलिसांनी कत्तलीसाठी जाणार्‍या २१ रेड्यांचे प्राण वाचवले !

२ धर्मांधांच्या विरोधात गुन्हा नोंद !

दौंड (जिल्हा पुणे) – पशूवध (कत्तल) करण्याच्या उद्देशाने टेंपोमध्ये दाटीवाटीने बांधण्यात आलेल्या २१ रेड्यांची सुटका दौंड पोलिसांनी केली आहे. या कारवाईत टेंपोसह ५ लाख ६५ सहस्र ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. टेंपोचालक मुस्तफा शहा आणि अब्दुल कुरेशी यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही करणे, किती आवश्यक आहे ? याचे प्रमाण देणारी घटना ! – संपादक)

कोल्हापूर जिल्ह्यातून दौंड-पाटसमार्गे हे रेडे कल्याणकडे जात होते. दौंड रेल्वे उड्डाणपुलावरून पाटसच्या दिशेने जाणार्‍या एका टेंपोस कागदपत्रे पडताळणीसाठी थांबवण्यात आले. टेंपोच्या आतील मालाविषयी विचारणा केल्यावर चालकाने विसंगत उत्तरे दिली. पोलिसांनी टेंपोची पडताळणी केली असता २१ रेडे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे उघड झाले.

संपादकीय भूमिका

सातत्याने घडणार्‍या गोवंशियांच्या हत्या थांबवण्यासाठी हिंदूंनी प्रशासनाकडे वैध मार्गाने पाठपुरावा करणे आवश्यक !