सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !
मनाला निरुत्साह आल्यास नामजप अधिक भावपूर्ण करून उपास्यदेवतेशी एकरूप होण्याचा प्रयत्न करावा !
श्री. किसन राऊत : मला निरुत्साह जाणवत आहे. मी आढावासेवकांना हे सांगितले, तर त्यांनी मला चिंतन करायला सांगितले.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : यात महत्त्वाचे काय, तर निरुत्साह कुणाला येतो ? ज्याचा नामजप चांगला होत नाही आणि जो जपातील देवाशी एकरूप होत नाही, त्याला निरुत्साह येतो. अशा वेळी नामजप अधिक भावपूर्ण करून वाढवत न्यायचा. त्यामुळे निरुत्साह येणार नाही.