समाजात गायले जाणारे नामजप आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी काळानुसार सिद्ध केलेले नामजप यांच्यात लक्षात आलेला भेद !
‘देवाचे अखंड नाम घेऊन आणि देवाच्या नामात तल्लीन होऊन संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर, संत जनाबाई आदी अनेक थोर संत मोक्षाप्रत गेले आहेत. असा देवांच्या नामजपाचा महिमा आहे.
सध्या विविध चालींत आणि लयींत देवतांचे नामजप म्हटल्याचे आपण पहातो आणि ऐकतो. ‘भक्तजनांना नामजपाचा लाभ व्हावा’, यासाठी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार माझ्या (सुश्री (कु.) तेजल पात्रीकर, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ४६ वर्षे यांच्या) आवाजात काळानुसार काही देवतांचे नामजप सिद्ध केले आहेत. समाजातील कलाकारांनी गायलेले आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार सिद्ध केलेले नामजप ऐकतांना माझा झालेला तुलनात्मक अभ्यास येथे दिला आहे.
१. समाजात म्हटले जाणारे नामजप आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार सिद्ध केलेले नामजप यांचा तुलनात्मक अभ्यास
टीप १ : नामजप म्हणतांना अनेक वाद्यांची जोड देण्यापेक्षा ‘अनेकातून एकात’ या अध्यात्मातील सिद्धांतानुसार नामजप गातांना वाद्यांची जोड न दिल्यास मन एकाग्र व्हायला साहाय्य होते. नामजप म्हणतांना वाद्यांची जोड दिल्यास वाद्यांकडे लक्ष जाऊन मन बहिर्मुख होते.
टीप २ : संत साक्षात् देवाचे सगुण रूप असल्याने आणि साधक साधना करत असल्याने संतांनी किंवा साधना करणार्या साधकांनी गायलेल्या नामजपात त्या देवतेचे तत्त्व अधिक प्रमाणात येते.
२. नामजप म्हणतांना आलेल्या अनुभूतींची सारणी चिंतन न करताही सहजतेने लिहून होणे
मला या सारणीचे लिखाण दैवी झाल्याची अनुभूती आली. हा लेख लिहितांना अकस्मात् मला वाटले, ‘सारणी बनवावी.’ ‘त्यात काय लिहायचे ?’, हे मला सुचले नव्हते. संगणकात ही सारणी करायला घेतल्यावर ‘आडवे-उभे रकाने किती करायचे ?’, हे आपोआप निवडले गेले.
विशेष म्हणजे मी ‘काय लिहायचे ?’, याचे चिंतन केले नसूनही देवाने माझ्याकडून सहजतेने १० मिनिटांत ही सूत्रे लिहून घेतली. मी एकदाही बुद्धीने विचार केला नाही. शेवटचा रकाना लिहून झाल्यानंतर मी ‘आणखी काही लिहायचे राहिले नाही ना ?’, असे आठवत होते; मात्र मला एकही सूत्र आठवले नाही. ‘हे लिखाण भगवंताच्या कृपेनेच झाले’, हे मी अनुभवले.
‘गुरुदेवांनी सकल जिवांना शास्त्रानुसार आणि काळानुसार १४ नामजप उपलब्ध करून दिले’, याबद्दल आम्ही त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.’
– सुश्री (कु.) तेजल पात्रीकर, संगीत विशारद (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ४६ वर्षे), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |