IIT Bombay disrespecting Bhagwan RamSita : ‘आयआयटी बाँबे’च्या विद्यार्थ्यांकडून नाटकाद्वारे प्रभु श्रीराम आणि सीता यांचा अवमान !

  • रामायणाचे अश्‍लील पद्धतीने सादरीकरण

  • लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी

‘आयआयटी बाँबे’मध्ये रामायणाचे अश्‍लील पद्धतीने सादरीकरण

मुंबई : ‘आयआयटी बाँबे’मध्ये हिंदु देवतांचा अवमान करण्यात आला. येथील सांस्कृतिक महोत्सवात ‘राहोवन’ नाटकात सहभागी झालेल्यांनी प्रभु श्रीरामाची खिल्ली उडवली, तसेच संपूर्ण रामायण हे अश्‍लील आणि अपमानास्पद पद्धतीने दाखवले.

(सौजन्य : D S D T TV)

(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. –  संपादक)

या नाटकात श्रीरामाचे नाव ‘राया’, सीतेचे नाव ‘भूमी’ आणि रावणाचे नाव ‘अघोरा’ असे ठेवण्यात आले होते. या नाटकात ‘राम आणि सीता एकमेकांवर आक्रमण करत आहेत, रावणाने केलेल्या अपहरणामुळे सीता लंकेत आनंदी असून त्याची स्तुती करत आहे, लक्ष्मण आणि सीता एकमेकांशी अश्‍लील संवाद साधत आहेत’, असे दाखवण्यात आले होते. नाटकाचे लेखक, दिग्दर्शक आणि अभिनय करणारे विद्यार्थी यांच्यावर कठोर कारवाईची मागणी ‘आयआयटी बाँबे’मधीलच काही हिंदु विद्यार्थ्यांनी केली आहे. आयआयटी बाँबेने या घटनेसंदर्भात अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

संपादकीय भूमिका

  • उठसूठ कुणीही हिंदूंच्या देवतांची टिंगलटवाळी करतो आणि तरीही त्याच्यावर कुठलीही कारवाई होत नाही, हे १०० कोटी हिंदूंना लज्जास्पद ! अशा प्रकारे अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांचे विडंबन कुणी करू धजावत नाही. हिंदूंच्या भावना दुखावणार्‍यांना आजन्म कारावासात डांबण्याची शिक्षा व्हायला हवी !
  • अशा संस्थांमधून तयार होणारे ‘भावी अधिकारी’ कुठल्या मानसिकतेचे असतील ? हे वेगळे सांगायला नको !