Canada Election China Interference : कॅनडातील निवडणुकींत चीनचा हस्तक्षेप; दोन्ही वेळा ट्रूडो विजयी ! – गुप्तचर संस्था
ओटावा – भारत आमच्या निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करत असल्याचा आरोप कॅनडाच्या सरकारने केला होता; मात्र आता कॅनडाच्याच ‘कॅनेडियन सिक्युरिटी इंटेलिजेंस सर्व्हिस’ (सी.एस्.आय.एस्.) या गुप्तचर संस्थेने अधिकृत खुलासा केला आहे की, देशाच्या मागील दोन निवडणुकींमध्ये चीनने हस्तक्षेप केला आहे. कॅनडाच्या राजकारणात चिनी सहभागाचे हे आतापर्यंतचे सर्वांत मजबूत प्रदर्शन आहे. ‘कॅनेडियन सिक्युरिटी इंटेलिजेंस सर्व्हिस’ (सीएस्आयएस्) या गुप्तचर संस्थेने सिद्ध केलेल्या अहवालात चीनच्या हस्तक्षेपाविषयी दावा करण्यात आला आहे.
कॅनडाच्या निवडणुकीत भारताचा हस्तक्षेप नाही ! – कॅनडाचे वरिष्ठ अधिकारी
पंतप्रधान कार्यालयात सुपुर्द केलेल्या या अहवालात म्हटले आहे की, ‘पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना’ने (‘पी.आर्.सी.’ने) वर्ष २०१९ आणि २०२१ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकींत गुप्त अन् फसव्या पद्धतीने हस्तक्षेप केला होता. पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या पक्षाने या दोन्ही निवडणुका जिंकल्या होत्या. या दस्तऐवजात असेही म्हटले आहे की, देशातील वर्ष २०२१ मधीला निवडणुकीवर देखरेख करणार्या कॅनडाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या पथकाला या निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी भारताकडून कोणत्याही प्रकारे प्रयत्न झाल्याचा पुरावा आढळला नाही. कॅनडाच्या निवडणुकींत भारताने हस्तक्षेप केल्याचा दावा भारताने यापूर्वीच फेटाळून लावला होता.
संपादकीय भूमिकायावरून भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर खलिस्तानधार्जिण्या ट्रुडो यांचा बुरखा फाडला पाहिजे ! |