KCYM The Kerala Story : केरळमधील ‘केरल कॅथॉलिक युथ मूव्हमेंट’ ख्रिस्ती युवा संघटना राज्यात विविध ठिकाणी ‘द केरल स्टोरी’ चित्रपट प्रदर्शित करणार !
थिरूवनंतरपूरम् (केरळ) – केरळमधील ख्रिस्ती युवा संघटना ‘केरल कॅथॉलिक युथ मूव्हमेंट’ राज्यात विविध ठिकाणी ‘द केरल स्टोरी’ चित्रपट प्रदर्शित करणार आहे. इडुक्की चर्च प्रशासनाच्या समर्थनार्थ या संघटनेने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ‘लव्ह जिहाद’ आणि इस्लामिक स्टेट यांची भीषणता दाखवणारा हा चित्रपट इडुक्की आणि थामरसेरी चर्च प्रशासनाने मुलांना दाखवला होता.
१. या युवा संघटनेचे संचालक पाद्री जॉर्ज वेल्लाक्कुडीयल म्हणाले की, ‘द केरल स्टोरी’ दाखवल्यानंतर इडुक्की चर्च प्रशासनाला प्रसारमाध्यमे आणि इतर यांनी त्रास दिल्याने आम्ही ही घोषणा केली आहे. ‘द केरल स्टोरी’ला काल्पनिक चित्रपट म्हटले जात असले, तरी आम्ही अनेक ख्रिस्ती मुलींना वाईट संबंधांपासून वाचवले आहे. आम्हाला काळजी वाटते की, मुलींना लग्नासाठी धर्मांतर करण्यास सांगितले जाते आणि नंतर त्यांच्या पालकांना त्यांना भेटण्याची अनुमतीदेखील दिली जात नाही.
२. युवा संघटनेचे थमारासेरी प्रदेशाचे अध्यक्ष रिचर्ड जॉन यांनी सांगितले की, ‘द केरल स्टोरी’ पुन्हा एकदा इडुक्कीमध्ये प्रदर्शित केला जाईल आणि आम्हाला वरिष्ठ चर्च अधिकार्यांचा पाठिंबा आहे. मलप्पूरम् आणि कोझिकोड या शहरांमध्येही आमच्या संघटनेचे कार्य चालू आहे. आमच्या विभागाने धर्मांतराची ३२५ प्रकरणे उघड झाली आहेत. ही संख्या या समस्येचे गांभीर्य अधोरेखित करते. हा चित्रपट दाखवण्यामागे कोणताही राजकीय उद्देश नाही.
केरल कॅथॉलिक युथ मूव्हमेंट संघटनेचा परिचय
उकेरल कॅथॉलिक युथ मूव्हमेंट ही केरळमधील कॅथॉलिक ख्रिस्ती तरुणांची एक मोठी संघटना आहे. तिच्या अंतर्गत लॅटिन चर्च, सायरो मलबार चर्च आणि सायरो मलंकारा चर्च या ३ संघटना आहेत. यापूर्वी सायरो मलबार चर्चच्या इडुक्की प्रशासनाने हा चित्रपट १०वी आणि १२वी पर्यंतच्या मुलांना दाखवला होता. या वेळी त्यांना लव्ह जिहादवरील पुस्तिकाही वाटण्यात आल्या. तसेच सायरो मलबार चर्चच्या थामरसेरी डायोसीजने हा चित्रपट मुलांना दाखवण्याचा निर्णय घेतला होता.
३. या संघटनेचे आणखी एक पदाधिकारी अखिल सी जोस यांनी सांगितले की, चित्रपट दाखवण्याच्या इडुक्की चर्च प्रशासनाच्या निर्णयावर टीका झाली, तेव्हा विरोध डावलून आम्ही तो प्रसारित करण्याचा निर्णय घेतला. मुलांना प्रेमाच्या धोक्यांपासून वाचवण्यासाठी हा चित्रपट दाखवत असल्याचे त्यांनी सांगितले.
संपादकीय भूमिकाकेरळमधील ख्रिस्ती संघटनाही लव्ह जिहाद असल्याचे स्वीकारते. याविषयी निधर्मीवाद्यांना काय म्हणायचे आहे ? |