Adv Ashwini Upadhyay Visit : हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आश्रमात चालू असलेले कार्य स्फूर्तीदायी ! – अधिवक्ता उपाध्याय
सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता (श्री.) अश्विनी उपाध्याय यांची रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !
रामनाथी (गोवा) – सर्वोच्च न्यायालयाचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता (श्री.) अश्विनी उपाध्याय यांनी गुढीपाडव्याच्या मंगलपर्वावर ९ एप्रिल या दिवशी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी आश्रमात चालू असलेल्या राष्ट्र आणि हिंदु धर्म प्रसारकार्याची माहिती अत्यंत आस्थेने जाणून घेतली. त्यांच्यासमवेत गोव्यातील प्रसिद्ध हिंदुत्वनिष्ठ उद्योजक श्री. जयंत मिरिंगकर हेसुद्धा उपस्थित होते. सनातनचे साधक श्री. निषाद देशमुख यांनी त्यांना आश्रमात चालू असलेल्या कार्याची ओळख करून दिली.
यानंतर झालेल्या एका अनौपचारिक सोहळ्यात सनातन प्रभात नियतकालिकांचे नूतन समूह संपादक श्री. योगेश जलतारे यांनी अधिवक्ता उपाध्याय यांचा हार घालून अन् शाल-श्रीफळ, तसेच भेटवस्तू देऊन सत्कार केला. श्री. मिरिंगकर यांचाही अधिवक्ता जलतारे यांनी सत्कार केला.
.@AshwiniUpadhyay ji visited our head office in Goa today.
Our editor-in-chief Yogesh Jaltare ji and he had a cordial discussion on various issues pertaining to the Rashtra and Hindu Dharma.
Ashwini ji spoke about Hindu Rashtra amongst other things.
He was warmly felicitated. pic.twitter.com/B7IXkMqjTu
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 9, 2024
या प्रसंगी बोलतांना अधिवक्ता उपाध्याय म्हणाले की, आश्रमात चालू असलेले कार्य अतुलनीय आहे. येथे प्रचंड प्रमाणात सात्त्विकता असून ईश्वरी चैतन्याची अनुभूती येते. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी चालू असलेले कार्य अत्यंत स्फूर्तीदायी आहे.
अधिवक्ता उपाध्याय हे हिंदू सांस्कृतिक न्यासाच्या वतीने गुढीपाडव्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला गोव्यात आले आहेत. आश्रम पाहून ते या कार्यक्रमाला रवाना झाले. त्यांचे ‘रामराज्य आणि भारतीय राज्यघटना’ या विषयावर कार्यक्रमात मार्गदर्शन झाले.