मुंबईत गिरगाव, भांडुप आणि विलेपार्ले येथे नववर्ष स्वागत फेर्‍या !

फेर्‍यांमध्ये हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेचा सहभाग !

गिरगाव येथील फेरीत सहभागी झालेले रणरागिणीचे पथक

मुंबई – गुढीपाडवा अर्थात हिंदूंच्या नववर्षदिनाच्या निमित्ताने ठिकठिकाणी स्वागत फेर्‍या काढून उत्साहपूर्ण वातावरणात नववर्षाचे स्वागत करण्यात येते. ९ एप्रिल या दिवशी मुंबईत गिरगाव, भांडुप आणि विलेपार्ले येथील नववर्ष स्वागत फेर्‍यांमध्ये हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेनेही सहभाग घेण्यात आला.

हिंदूंनी यात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशे, लेझीम, भगवे ध्वज घेऊन नागरिक या फेर्‍यांमध्ये सहभागी झाले होते. समितीच्या रणरागिणी शाखेच्या युवती, तसेच समितीच्या युवा कार्यकर्त्यांनी या फेर्‍यांमध्ये स्वसंरक्षण प्रात्यक्षिके या वेळी करून दाखवली. यामध्ये कराटेचे प्रकार, लाठीकाठी, दंडसाखळी, तसेच काही प्रसंगात स्वसंरक्षण कसे करावे ? याची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. महिला आणि युवती यांनी स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे, हा संदेश या प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून देण्यात आला.