‘भगवा आतंकवाद’ म्हणणार्या सुशीलकुमार शिंदे यांनाही हिंदु नववर्षाच्या शुभेच्छा देतो ! – राम सातपुते, भाजप
सोलापूर – ‘भगवा आतंकवाद म्हणणार्या सुशीलकुमार शिंदे यांनाही हिंदु नववर्षाच्या शुभेच्छा’, असे म्हणत सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह सुशीलकुमार शिंदे यांच्यावर ९ एप्रिल या दिवशी पत्रकारांशी बोलतांना टीका केली. गुढीपाडव्याच्या निमित्ताने राम सातपुते यांनी सोलापूरकरांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
राम सातपुते म्हणाले की, गुढीपाडवा हा आनंदाचा सण आहे. येणारे नवीन वर्ष आपल्या सर्वांसाठी आनंद घेऊन यावे. हा देश पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करील. गुढीपाडव्याच्या निमित्ताने सोलापूरचा विकास व्हावा, सोलापूर येथे विमानतळ आणि ‘आयटी पार्क’ चालू करण्याचा संकल्प करत आहे. माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवार असणार्या प्रणिती शिंदे यांच्या वडिलांनी ‘भगवा आतंकवाद’ शब्द वापरला होता; मात्र हिंदु समाज हा सहिष्णु समाज आहे. आमची गुढी भगवी आहे. असे असतांना ‘भगवा आतंकवाद’ म्हणणार्या सुशील कुमार शिंदे यांना मी हिंदु नववर्षाच्या शुभेच्छा देत आहे.