नाभा (पंजाब) येथे सरकारी महाविद्यालयात प्राचार्यांच्या दालनात विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार !

चंडीगड – पंजाबमधील नाभा येथील सरकारी महाविद्यालयात कला शाखेच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मुख्याध्यापकांच्या दालनात २७ मार्च या दिवशी घडली; मात्र तक्रार आता करण्यात आली आहे. या तक्रारीवरून ३ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दविंदर सिंह असे त्यापैकी एका आरोपी विद्याथ्याचे नाव आहे. या विद्यार्थिनीला मुख्याध्यापकांच्या खोलीत बोलावण्यात आले होते. ती तिथे गेली, तेव्हा दविंदर सिंह याच्यासह आणखी २ आरोपीही तिथे होते. तिघा जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

तरणतारणमध्ये महिलेला करण्यात आले होते अर्धनग्न

पंजाबमधल तरनतारनमध्ये काही दिवसांपूर्वी एका महिलेला अर्धनग्न अवस्थेत रस्त्यावर पळवण्यात आले. मुलीच्या प्रेमविवाहामुळे संतप्त झालेल्या कुटुंबियांनी तरुणाच्या आईचे कपडे फाडून तिला अर्धनग्न केले होते. या प्रकरणी पोलिसांनी ४ जणांना अटक केली आहे. या प्रकरणावर पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने म्हटले होते की, तरणतारणच्या घटनेने आपल्याला महाभारत काळाची आठवण करून दिली. द्रौपदीचे वस्त्रहरण झाले, तेव्हा पांडव आणि भीष्म पितामह शांत होते. या मौनाचा परिणाम म्हणजे महाभारत युद्धात लाखो लोकांचा मृत्यू झाला. आज कायद्याच्या अंमलाखाली असतांना, प्रशासनाच्या नाकाखाली अशी घटना घडत असतांना आपण मूक प्रेक्षक बनून राहू शकत नाही.

संपादकीय भूमिका 

  • महाविद्यालयात आणि तेही प्राचार्यांच्या दालनात अशा घटना घडत असतील, तर जनतेला नैतिकेचे शिक्षण कोण देणार आणि विद्यार्थी कुणाकडे आदर्श म्हणून पहाणार ?
  • पंजाबमध्ये सत्तेवर असणार्‍या आम आदमी पक्षाच्या सरकारला हे लज्जास्पद !