नागपूर येथे भरधाव कंटनेरच्या धडकेत १२ वाहनांची हानी !
• कार आणि रुग्णवाहिका यांचा चेंदामेंदा• १५ हून अधिक जण घायाळ ! |
नागपूर – ७ एप्रिलच्या रात्री शहरातील मानकापूर परिसरात चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कंटेनरने सिग्नलच्या ठिकाणी उभ्या असलेल्या १२ दुचाकी आणि चारचाकी वाहनांना धडक दिली. यात अनेक चारचाकी वाहनांचा चेंदामेंदा झाला. यामध्ये ६ चारचाकी, १ रुग्णवाहिका आणि २ दुचाकी वाहनांचा समावेश आहे. १५ हून अधिक जण घायाळ झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.