अमली पदार्थ विक्री प्रकरणात कोट्यवधी रुपयांची देवाणघेवाण करणारा अटकेत !
मुंबई – एम्.डी या अमली पदार्थाची कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणारा, तसेच अमली पदार्थ विकणार्या टोळीसाठी पैशांची देवाणघेवाण करणारा हवाला व्यावसायिक जेसाभाई मोटाभाई माली याला पोलिसांनी अटक केली आहे. आतापर्यंत अमली पदार्थ प्रकरणात पोलिसांनी एकूण ११ आरोपींना अटक केली आहे. (संबंधितांना कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी ! – संपादक)
संपादकीय भूमिकाअमली पदार्थ विक्री प्रकरणातील आरोपींचा आकडा वाढतच चालला आहे. यावरून राज्यात व्यसनाधीनता किती फोफावली असेल, याची कल्पना येते ! |