‘सेट’ परीक्षेला दीड सहस्र परीक्षार्थी अनुपस्थित !
छत्रपती संभाजीनगर येथे २२ केंद्रांवर विद्यार्थ्यांनी दिला पेपर !
छत्रपती संभाजीनगर – शहरातील २२ परीक्षा केंद्रांवर ८ सहस्र १०५ विद्यार्थ्यांनी ७ एप्रिल या दिवशी ‘सेट’ची परीक्षा (राज्यपात्रता चाचणीची) दिली. यासाठी ९ सहस्र ६३० परीक्षार्थींनी नोंदणी केली होती. प्रत्यक्षात दीड सहस्र परीक्षार्थी अनुपस्थित राहिले. ८ सहस्र १३० जणांनी पेपर सोडवला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या वतीने ७ एप्रिल या दिवशी ‘सेट’ची परीक्षा घेण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली.