हिंदूंनो, धर्माचरण करून गुढीपाडव्याचा सण सात्त्विक पद्धतीने साजरा करूया आणि स्वत:तील धर्मतेज जागवूया !
‘सनातन हिंदु धर्माची निर्मिती साक्षात ईश्वराने केलेली आहे. त्यामुळे धर्मातील प्रत्येक अंग हे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या १०० टक्के योग्य, लाभदायक अन् परिपूर्ण आहे.
१. सुती किंवा रेशमी नऊवारी साडी आणि धोतर यांमध्ये पुष्कळ सात्त्विकता अन् चैतन्य असल्यामुळे ही वस्त्रे परिधान करणार्यांनाही सात्त्विकता, तसेच चैतन्य यांचा लाभ होण्यास साहाय्य होेते.
२. स्त्रियांनी नथ, ठुशी, पाटल्या, पैंजण, कंबरपट्टा इत्यादी सोन्या-चांदीचे सात्त्विक अलंकार परिधान केल्याने देवतांच्या तेजतत्त्वयुक्त चैतन्यलहरी दागिन्यांकडे आकृष्ट होतात.
३. वेणी, खोपा किंवा अंबाडा यांसारखी सात्त्विक केशरचना केल्याने त्यांची सात्त्विकता वाढून साधनेला पोषक असणारी सुषुम्ना नाडी चालू रहाते.
४. पारंपरिक सात्त्विक पोषाख, अलंकार परिधान केल्याने आणि केशरचना केल्याने आपल्याकडून धर्माचरण होऊन आपल्यावर ईश्वराची कृपा होते.
५. पारंपरिक सात्त्विक हिंदु वस्त्र, अलंकार आणि केशरचना यांच्या त्रिवेणी संगमामुळे सणाच्या दिवशी वायूमंडलात मोठ्या प्रमाणात प्रक्षेपित होणार्या देवतांच्या चैतन्यलहरी आपल्याला अधिकाधिक प्रमाणात ग्रहण होतात.
६. पारंपरिक सात्त्विक हिंदु वस्त्र, अलंकार आणि केशरचना यांमुळे या गोष्टी धारण करणारा, त्यांना पहाणारा अन् त्यांच्या सभोवतालच्या व्यक्ती यांनाही सात्त्विकता तसेच चैतन्य यांचा लाभ होऊन सर्वांचीच सात्त्विकता वाढण्यास आणि वाईट शक्तींचा त्रास न्यून होण्यास साहाय्य होते.
७. व्यक्तीच्या भोवतीचे वायूमंडल सात्त्विक बनते.
८. देवतांनी युक्त चैतन्यलहरी वातावरणातही प्रक्षेपित होते.
पारंपरिक सात्त्विक हिंदु वस्त्र, अलंकार आणि केशरचना यांमुळे व्यष्टी अन् समष्टी स्तरांवर आध्यात्मिक लाभ १०० टक्के होतो. सर्व हिंदु बंधू-भगिनींना विनंती आहे की, या गुढीपाडव्याला, तसेच वर्षभरात येणार्या सर्व हिंदु सणांना पारंपरिक आणि सात्त्विक हिंदु पोषाख परिधान करून अन् शक्य असल्यास सोन्या-चांदीचे सात्त्विक पारंपरिक अलंकार परिधान करून आणि वेणी, खोपा किंवा आंबाडा यांसारखी सात्त्विक केशरचना करून देवतांचे शुभाशीर्वाद संपादन करूया.’
– सुश्री (कु.) मधुरा भोसले, (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. |