१० एप्रिलपासून प.पू. डॉ. के.ब. हेडगेवार व्याख्यानमाला !
कोल्हापूर – कोल्हापूर शहरात राष्ट्रीय विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोचवण्यासाठी हिंदु व्यासपीठ प्रतिवर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक ‘प.पू. डॉ. के.ब. हेडगेवार’ व्याख्यानमाला आयोजित करते. यंदा या व्याख्यानमालेचे २८ वे वर्ष असून यंदा ही व्याख्यानमाला १०, ११ आणि १२ एप्रिलला प्रतिदिन सायंकाळी ६.३० वाजता शाहू स्मारक भवन येथे होईल. १० एप्रिलला श्री. अभिजित जोग यांची ‘डावी वाळवी’, ११ एप्रिलला श्री. योगेश यांचे ‘क्रांतीकारक सावरकर’, तर १२ एप्रिलला सौ. मैत्रेयी शिरोळकर यांचे ‘मातृशक्ती जिजाऊ’ या विषयावर व्याख्यान होईल. तरी अधिकाधिक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कार्यवाह श्री. उदय सांगवडेकर यांनी केले आहे.