अकोला येथे अटकेतील गुंडाच्या साथीदाराकडून कारागृह निरीक्षकाला जिवे मारण्याची धमकी !
अकोला – कुख्यात गुंड गजानन कांबळे याला कारागृहात भेटण्यासाठी आलेल्या त्याच्या साथीदारांनी कारागृह निरीक्षकालाच धमकी देत धक्काबुक्की केली. कारागृहाच्या प्रवेशद्वारासमोर गाडी लावल्यावरून त्यांच्यात वाद झाला होता. साथीदारांपैकी लाल्या पालकर याने अधिकार्याची कॉलर पकडून बंदुकीने उडवून देण्याची आणि जिवे मारण्याची धमकी दिली. (अशा उद्दाम साथीदारांनाही कारागृहात डांबायला हवे ! – संपादक) या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद झाला आहे. पालकर याला वाशिमच्या कारागृहात ठेवण्यात आले आहे.