दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप
बेकायदा बांधकामाप्रकरणी विकासकावर गुन्हा नोंद !
नवी मुंबई – येथील महापालिकेची कोणत्याही प्रकारच्या बांधकामासाठी पूर्वअनुमती घेता बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात हंसराम चौधरी नावाच्या विकासकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकाअशांकडून बांधकाम केल्याचे पैसे वसूल करून त्यांना कठोर शिक्षाही करायला हवी ! |
लहान कंत्राटांवर आम्ही लक्ष ठेवू शकत नाही ! – मुंबई उच्च न्यायालय
मुंबई – कंत्राटाची कामे देतांना त्यात भ्रष्टाचार आणि पक्षपातीपणा होत असल्याचा दावा करत मुंबई उच्च न्यायालयात प्रविष्ट करणार्या याचिकाकर्त्याला मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले. ‘प्रत्येक लहान कंत्राटावर आम्ही लक्ष ठेवू शकत नाही’, असे स्पष्ट करत न्यायालयाने ही याचिका निकाली काढली. कुळगाव-बदलापूर नगर परिषदेमधील कामाचे कंत्राट संबंधितांना देतांना त्यात भ्रष्टाचार होत असल्याचा दावा करत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका मीनाक्षी डोईफोडे यांनी याचिका प्रविष्ट केली होती.
रेल्वे रुळ ओलांडणार्यांना रोखण्यासाठी मध्य रेल्वेची मोहीम !
मुंबई – रेल्वे रुळ ओलांडणार्यांना रोखण्यासाठी आणि ‘झिरो डेथ मिशन’ अंतर्गत मध्य रेल्वेने ४ आणि ५ एप्रिल २०२४ या दिवशी जनजागृती मोहीम राबवली. माहिती पत्रिकाचे वितरण, पथनाट्य आणि फलक यांद्वारे प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे.
विक्रोळी येथे अपुरा आणि दूषित पाणीपुरवठा !
विक्रोळी – येथील कन्नमवार नगरमध्ये फुटलेली जलवाहिनी दुरुस्त झाली असून पाणीपुरवठा पूर्ववत झाला आहे; पण तेथे अनेक भागांत अपुरा आणि दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.
संपादकीय भूमिकापाण्याची समस्या असणे प्रशासनाला लज्जास्पद ! |