गुढीपाडव्याप्रीत्यर्थ हार्दिक शुभेच्छा।
उद्या ९ एप्रिल २०२४ या दिवशी गुढीपाडवा आहे. त्या निमित्ताने…
चैत्र शुद्ध प्रतिपदा तिथी म्हणजे काय ?
ऐक हिंदु बांधवा।
हिंदु नववर्षारंभ असे तो।
मंगल गुढीपाडवा।। १।।
गर्व से कहो हम हिंदू है।
अशा नको केवळ घोषणा वल्गना।
हिंदुत्व खरोखर जगा-जागवा।
संदेश हा पोचवा सर्वांना।। २।।
मंगल गुढी उभारा घरी।
हिंदु संस्कृती जागवा घरोघरी।
छत्रपती शिवराय, संभाजी यांचाच खरा आदर्श।
बना नरवीर तानाजी।। ३।।
स्वामी विवेकानंद ते नेताजी सुभाषबाबू।
स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंह यांचे जगा हिंदुत्व।
आणा ते आचरणी।
नका बनू सरकारी बाबू।। ४।।
नववर्षाच्या शुभेच्छा द्या हिंदु बांधवांना।
मंगल गुढीपाडव्याच्या दिवशी।
इंग्रजी भाषेचा वापर टाळून।
मातृभाषेचा वापर करा अहर्निशी।। ५।।
गुढीपाडव्यास या करा संकल्प।
हिंदु म्हणुनी जगण्या-मरण्याचा।
त्यातूनच होई उदय लवकरी।
स्वातंत्र्यविरांच्या हिंदु राष्ट्राचा।। ६।।
याच आमच्या इच्छा अन् गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !
– श्री. दत्तात्रय पटवर्धन (वय ७१ वर्षे), कोलगाव, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग. (५.४.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |