BJP Locket Chatterjee Attacked : बंगालमध्ये भाजपच्या उमेदवार लॉकेट चटर्जी यांच्यावर जमावाचे आक्रमण
कोलकाता (बंगाल) – बंगालमधील हुगळी लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या महिला उमेदवार लॉकेट चॅटर्जी यांच्यावर ६ एप्रिल या दिवशी जमावाने आक्रमण केले. त्या हुगळीच्या बांसुरिया भागातील एका मंदिरात काली पूजेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून परतत होत्या. त्या वेळी त्यांच्या वाहानावर आक्रमण करण्यात आले. या आक्रमणात लॉकेट चॅटर्जी यांना दुखापत झाली नाही. या आक्रमणाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.
TMC's goons, led by Shilpi Chatterjee, shamelessly attacked my vehicle amidst #KaliPuja in Bansberia.
Their audacity exposes the Trinamool's mafia grip over Hooghly. Today, their thugs dared to block my pilgrimage to Maa's Puja.
The lack of candidate security is appalling, a… pic.twitter.com/a4BomO4SzQ
— Locket Chatterjee (Modi Ka Parivar) (@me_locket) April 6, 2024
लॉकेट चॅटर्जी यांच्या म्हणण्यानुसार जमाव कुठून आला हे स्थानिक लोकांना किंवा पोलिसांना ठाऊक नाही. घटनेच्या वेळी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे नेते घटनास्थळी उपस्थित होते. गर्दीतील एका व्यक्तीने वाहानाला दोनदा धडक दिली आणि वाहनामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. जमाव हिंसक बनला होता. पोलीस घटनास्थळी पोचले असता त्यांना या जमावात सहभागी असलेल्या लोकांची ओळख पटवण्यात अपयश आले. या जमावासोबत तृणमूल काँग्रेसच्या नेत्या शिल्पी चॅटर्जी आणि त्याच पक्षाचे नगरसेवक रणजीत उभे होते. निवडणूक आयोगाकडे तक्रार करत लॉकेट चॅटर्जी यांनी शिल्पी आणि इतर आरोपी यांना कारागृहात पाठवण्याची मागणी केली आहे.
या आक्रमणामागचा हेतू मतदारांना घाबरवणे, हा आहे.मतदारांना मतदान करण्यापासून रोखण्यासाठी हे आक्रमण करण्यात आले. विरोधकांचा हा हेतू यशस्वी होणार नाही. ममता बॅनर्जींचे बंगाल पोलीस या प्रकरणी गप्प आहेत, असा आरोप भाजपने केला आहे.
संपादकीय भूमिकाबंगाल म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले राज्य ! |