हिंदु नववर्षानिमित्त चिंचवड (पुणे) येथे भव्य शोभायात्रेचे आयोजन !
चिंचवड (जिल्हा पुणे) – प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच नववर्षारंभ अर्थात् गुढीपाडवा या दिवशी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी भव्य शोभा यात्रेचे आयोजन ‘संस्कृती संवर्धन विकास महासंघा’च्या वतीने करण्यात आले आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व समविचारी संस्था, संघटना सहभागी होणार आहेत. या शोभायात्रेत सर्व हिंदु बांधवांनीही मोठ्या संख्येने पारंपरिक वेशभूषेत सहकुटुंब सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. चिंचवड येथील श्री दत्त मंदिर, श्रीधरनगर येथून शोभयात्रेला आरंभ होऊन श्री धनेश्वर मंदिर, चिंचवड येथे सायंकाळी ७.३० वाजता महाआरती आणि प्रसादाने शोभयात्रेची सांगता होईल.
अशी होईल शोभायात्रा !
शोभायात्रा दिनांक : ९ एप्रिल २०२४, वेळ : सायं. ५ वाजता
ठिकाण : दत्त मंदिर, श्रीधरनगर, चिंचवड गाव
शोभायात्रा मार्ग : दत्त मंदिर, श्रीधरनगर-समर्थ रामदासस्वामी चौक-स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग-कालिका माता मंदिर-शिवाजी उदय मंडळ-पोदार शाळा-विवेक वसाहत चौक-केशवनगर शाळा-विठ्ठल-रखुमाई मंदिर-जुने पॉवर हाऊस चौक-गांधीपेठ-ज्ञानेश्वर मंडळापासून मोरया समाधी मंदिर मार्गे श्री धनेश्वर मंदिर चिंचवड.