धनप्राप्तीसाठी धनलक्ष्मी, धनकुबेर आदी धन देवतांची उपासना आवश्यक ! – विनोद सिंह, अध्यक्ष, गोमातेश्वरी अंबाधाम आश्रम
पालघर – आपण केवळ दिवाळीत धनत्रयोदशीच्या दिवशी धनलक्ष्मीची पूजा करतो. काहीजण वर्षभर अधूनमधून आर्थिक अडचण जाणवली, तर धनलक्ष्मीची पूजा करतात. वर्षभर काबाडकष्ट करूनही आपल्याला अपेक्षित धनप्राप्ती होत नाही; म्हणून प्रत्येक व्यक्तीने धनलक्ष्मी, प्रभु श्री धनकुबेर यांची उपासना करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन श्री गोमातेश्वरी अंबाधाम आश्रमचे अध्यक्ष विनोद सिंह यांनी केले आहे. ‘जनतेने येथे येऊन प्रभु श्री धनकुबेर यांची पूजाअर्चा करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत’, असेही ते म्हणाले.
ते म्हणाले की, पालघर जिल्ह्यातील मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाडाखडकोन मनोरजवळ श्री गोमातेश्वरी अंबाधाम आश्रम परिसरात प्रभु श्री धनकुबेर यांचे मंदिर भाविकांसाठी खुले झाले आहे. काही ग्रंथांमध्ये धनकुबेर यांना प्रसन्न करण्याचे महत्त्व आमचे मित्र एस्. मुलाणी यांच्याद्वारे आम्हाला लक्षात आले. त्यामुळेच आम्ही प्रभु श्री धनकुबेर यांचे मंदिर येथे बांधले.