गुढीपाडवा सांस्कृतिक आणि सामाजिक सेवा संस्थानकडून ९ एप्रिल या दिवशी हिंदु नववर्ष शोभायात्रा !
पनवेल – गुढीपाडव्यानिमित्त गुढीपाडवा सांस्कृतिक आणि सामाजिक सेवा संस्थानकडून कळंबोली येथे हिंदु नववर्ष शोभायात्रेचे आयोजन केले आहे. ही भव्य शोभायात्रा ९ एप्रिल या दिवशी सकाळी ८ वाजता तरंग सोसायटी सेक्टर १० पासून चालू होईल. गुढीपूजनानंतर बाईक रॅलीने शोभायात्रेला प्रारंभ होईल. कळंबोलीतील सर्व रहिवाशांनी आपल्या दारासमोर गुढी उभारून इमारतीच्या प्रवेशद्वारासमोर भव्य रांगोळी काढून यात्रेची शोभा वाढवावी. या रांगोळ्यांना विविध पारितोषिके दिली जातील. आपण सहकुटुंब सहपरिवार येऊन पारंपरिक वेशभूषा करून कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आव्हान समितीने सामाजिक माध्यमातून केले आहे. ८ एप्रिल या दिवशी रात्री ८ ते १० या वेळेत नृत्य अन् रांगोळी स्पर्धा ठेवण्यात आली आहे.