मॅफेड्रॉन बाळगल्याच्या प्रकरणी अमली पदार्थविरोधी पथकाकडून पुणे येथे २ धर्मांधांना अटक !
पिंपरी (जिल्हा पुणे) – अवैधरित्या एम्.डी. (मॅफेड्रॉन) विक्रीसाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने सापळा रचून मोई येथे अटक केली. इस्तियाक चौधरी, अब्दुल करीम चौधरी या दोघांना अटक केली असून त्यांचा साथीदार सोमनाथ चौधरी याच्यावर गुन्हा नोंद केला आहे.
आरोपी इस्तियाक आणि अब्दुल करीम हे दोघे १६ ग्रॅम वजनाचे मेफेड्रॉन विक्रीसाठी मोई गावातील भैरवनाथनगर येथे आले होते. त्यांच्याकडून मॅफेड्रॉन आणि ३ भ्रमणभाष असा एकूण ३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हे मॅफेड्रॉन आरोपींनी सोमनाथ चौधरी याच्याकडून आणल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी तिघांवर म्हाळुंगे एम्.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. अमली पदार्थविरोधी पथक या प्रकरणी अधिक अन्वेषण करत आहे.