पत्नीच्या हत्येच्या प्रकरणात पॅरोल मिळालेल्या फरार धर्मांध आरोपीला अटक !
(पॅरोल म्हणजे आरोपीला मिळणारी संचित रजा)
वसई – पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली कारागृहात असलेल्या आणि संचित रजा (पॅरोल) घेऊन फरार झालेल्या महंमद जावेद अली हुसेन अन्सारी (वय २८ वर्षे) याला पोलिसांनी अटक केली. गेल्या ५ वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. कोरोना महामारीच्या काळात त्याला संचित रजा (पॅरोल) संमत करण्यात आली होती. त्याने नियमित न्यायालयात उपस्थित रहाणे आवश्यक होते; पण रजा मिळताच तो फरार झाला होता.
संपादकीय भूमिका :पॅरोल मिळाल्यावर फरार होऊन न्यायालयाचा अवमान करणार्यांना कठोर शिक्षा द्यायला हवी ! |