India Election China Threat : चीनचा भारतातील लोकसभेच्या निवडणुकीत कृत्रिम बुद्धीमत्तेद्वारे (ए.आय.द्वारे) हस्तक्षेपाचा प्रयत्न!
जगप्रसिद्ध ‘मायक्रोसॉफ्ट’ आस्थापनाला संशय
नवी देहली – देशात होत असलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये चीन कृत्रिम बुद्धीमत्तेचा (ए.आय.चा) वापर करून हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय ‘मायक्रोसॉफ्ट’ या जगप्रसिद्ध आस्थापनाकडून व्यक्त करण्यात आला. मायक्रोसॉफ्टच्या ‘सेम टार्गेट्स, न्यू प्लेबुक्स : इस्ट एशिया थ्रेट अॅक्टर्स एम्प्लॉय युनिक मेथड्स’ हा अहवाल ‘मायक्रोसॉफ्ट थ्रेट नालिसिस सेंटर’कडून प्रसिद्ध करण्यात आला. त्यामध्ये हा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
#China may attempt to interfere in India's Loksabha elections using #ArtificialIntelligence (#AI)
– Suspicion of #Microsoft#Election2024 #LokSabhaElections2024
Watch a detailed report by @palkisu on @firstpost pic.twitter.com/6EzukcV60a— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 6, 2024
या अहवालात म्हटले आहे की, चीन ‘ए.आय.’द्वारे भारतातील लोकसभा निवडणूक, अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आणि दक्षिण कोरियाच्या ‘नॅशनल असेंब्ली’ची निवडणूक यांवर प्रभाव टाकून त्यात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करील. चीन तेथील मतदारांचा राजकीय पक्षांकडे असलेला कल पालटण्याचा किंवा कृत्रिम बुद्धीमत्तेच्या माध्यमातून त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करील. तो सामाजिक माध्यमांवर अशा प्रकारचा मजकूर पोस्ट करील, ज्यामुळे निवडणुकांच्या काळात राजकीय पक्षांकडे असलेल्या जनमतावर प्रभाव पडू शकतो. अशा प्रकारच्या आशयाचा निवडणुकीच्या निकालावर परिणाम होण्याची शक्यता अल्प असली, तरी तसा प्रयोग केला जाईल.