हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या धर्मांधांना उत्तरप्रदेश उच्च न्यायालयाचा धडा !
गेली काही वर्षे धर्मांधांकडून देशविरोधी, पाकिस्तानधार्जिण्या आणि हिंदु देवीदेवतांविरोधी घोषणा देण्याच्या घटना वाढल्या आहेत. यासाठी त्यांचे लांगूलचालन करणारे सर्वपक्षीय शासनकर्तेच उत्तरदायी आहेत. त्यांना पोलीस किंवा कायदा यांचे भय राहिलेले नाही. त्यांच्या विरोधात चुकून गुन्हा नोंदवला गेला, तर तो रहित करण्यासाठी त्यांना जन्महिंदु अधिवक्तेच न्यायालयात साहाय्य करतात आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली त्यांच्या याचिकाही संमत होतात.
१. लक्ष्मणपुरीमध्ये (उवरप्रदेश) धर्मांधांकडून हिंदूंच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न
लक्ष्मणपुरी (लखनौ) शहरातील हसनगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये फैजान अहमदसह अन्य २-३ धर्मांध एका हिंदु मंदिरात बलपूर्वक घुसले आणि त्यांनी मंदिरात चालू असलेल्या धार्मिक कार्यक्रमात अडथळा आणला. तेथे त्यांनी जाणीवपूर्वक हिंदूंच्या भावना दुखावल्या आणि ‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणा दिल्या. सुदैवाने मंदिरातील भाविकांनी त्यांना तेथेच पकडले आणि पोलिसांकडे तक्रार केली. नेहमीप्रमाणेच त्यांना धर्मांधाविरुद्ध गुन्हे नोंदवण्यासाठी न्यायालयात जावे लागले. हा सर्व प्रकार दखलपात्र गुन्ह्याचा असल्याने लक्ष्मणपुरीच्या कनिष्ठ स्तर फौजदारी न्यायाधिशाने त्यांना नोटिसा काढल्या. पुढे पोलिसांना अन्वेषण करावे लागले आणि आरोपपत्र प्रविष्ट (दाखल) झाले.
२. धर्मांधांची उत्तरप्रदेश उच्च न्यायालयात याचिका
या आरोपींवर लावण्यात आलेले गुन्हे आरोपपत्र रहित व्हावे, यासाठी त्यांनी उत्तरप्रदेश उच्च न्यायालयात याचिका केली. सुदैवाने उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा सांगोपांग विचार केला, तसेच पोलिसांनी तेथील प्रत्यक्षदर्शी भाविक आणि अन्य साक्षीदार यांच्या साक्ष नोंदवल्या. त्यात ‘धर्मांध आरोपींनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. त्यांनी हिंदु मंदिरात येऊन धार्मिक कार्यक्रमात अडथळा आणला, तसेच हिंदु धर्माविरुद्ध विधाने करून जाणीवपूर्वक धार्मिक भावना दुखावल्या. यातून त्यांनी दोन धर्मांमध्ये कटूता आणि कायदा-सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण होईल, असे कृत्य केले’, असे सांगितले.
३. आरोपींवरील गुन्हे आणि आरोपपत्र रहित करण्यास उच्च न्यायालयाचा नकार
उत्तरप्रदेश उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या जुन्या निवाड्यांचा आढावा घेतला. त्यानंतर आरोपींवरील फौजदारी गुन्हे आणि आरोपपत्र रहित करण्यास नकार दिला. पुष्कळ विलंबाने का होईना; परंतु दिलासादायक निकालपत्र आले. क्रिकेटचा सामना, हिंदूंचा कोणताही सण किंवा धर्मांधांची मिरवणूक असो त्यात देशविरोधी घोषणा देणे, पाकिस्तानधार्जिण्या घोषणा देणे; हिदूंचे संत, देवीदेवता यांचे विडंबन करणे, असे प्रकार जाणीवपूर्वक केले जातात. धर्मांधांचा विषय आला की, पोलीस शेपूट घालतात आणि तक्रार नोंदवून घेण्यास नकार देतात. एखादी तक्रार प्रविष्ट झाली, तरी न्यायालयात जन्महिंदू तत्परतेने मुसलमानांसाठी याचिका करून गुन्हा रहित करण्यासाठी प्रयत्न करतात. सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली धर्मांधांना झुकते माप दिले जाते. हिंदूंवर आघात होत असूनही ते जागे होत नाहीत, हे दुर्दैव आहे. हा निवाडा हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांनी त्यांच्याकडे जतन करून ठेवावा आणि आवश्यकतेनुसार हिंदूंना कायदेशीर साहाय्य करावे !’ (२३.३.२०२४)
श्रीकृष्णार्पणमस्तु ।
– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय