भाविकांची ८२ लाख रुपयांची फसवणूक करणार्या ३ मुसलमानांवर गुन्हा नोंद !
नागपूर – हजयात्रेच्या बहाण्याने भाविकांची ८२ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी जुनी कामठी पोलिसांनी तिघांविरुद्ध कट रचून फसवणूक केल्याचा गुन्हा नोंद केला. नसीम अख्तर महंमद हनिफ (वय ६९ वर्षे), अब्दुल अजीज शकील अहमद (वय ४२ वर्षे), महंमद असलम हफीज अब्दुल अजीज (वय ६० वर्षे) अशी गुन्हा नोंदवण्यात आलेल्यांची नावे आहेत. नूर महंमद कलीम अख्तर अन्सारी (वय ४२ वर्षे) यांनी या प्रकरणी तक्रार प्रविष्ट केली होती.
भाविकांनी पैसे भरूनही संबंधित पर्यटन आस्थापनाने भाविकांना हजयात्रेला पाठवले नाही. पैसे परत मागितले असता आरोपींनी कट रचून भाविकांच्या विरोधातच पोलीस तक्रारी केल्या. यानंतर नूर यांनी तक्रार दिली.
संपादकीय भूमिकाहे सर्व पैसे आरोपी मुसलमानांकडून सव्याज वसूल करायला हवेत ! |