सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

कुठल्याही दुकानात कितीही पैसे दिले, तरी आनंद विकत मिळत नसणे, तो स्वतः साधना करूनच मिळवावा लागणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सौ. स्वानंदी जाधव : पूर्वी कर्तेपणामुळे मनात पुष्कळ विचार असायचे किंवा कुठल्याही सेवेचा ताण यायचा; पण प्रत्येक वेळी वैयक्तिक काम असो किंवा सेवा असो, ‘देवच करून घेत आहे. प्रत्येक क्षणी तुम्ही समवेत आहात आणि तुम्हीच करून घेत आहात’, हेच मला अनुभवता आले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : इतरांच्यात ‘मी हे केले, मी ते केले किंवा मी हे करणार’, असा अहं असतो.  शाब्बास, प्रगती चांगली आहे.

सौ. स्वानंदी जाधव

सौ. स्वानंदी जाधव : आता मला सेवेचा ताण येत नाही. पूर्वी केवळ ग्रंथांशी संबंधित सेवा करत होते; पण आता मागच्या वर्षापासून शिवणाचीही सेवा करायला सांगितली आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : शिवणही येते का ?

सौ. स्वानंदी जाधव : हो; पण आता सेवेचा ताण येत नाही. सेवेतून आनंदच मिळतो. ‘देवच करून घेईल’, असे वाटत असल्यामुळे सेवा आपोआप होते. पूर्वीसारखे आता मनात विचारांचे अधिक प्रमाणही जाणवत नाही. त्यामुळे कृतज्ञता वाटते.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : आता आनंदी आहात ना ?

सौ. स्वानंदी जाधव : परम पूज्य, पुष्कळ आनंद मिळतो.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : दुकानात कितीही पैसे घेऊन गेलो, तरी कुठल्याही दुकानात आनंद विकत मिळणार नाही. तो स्वतःच (साधना करून) मिळवावा लागतो.