Cameroon Cheating 15 crore India:कॅमेरूनच्या २ विद्यार्थ्यांनी भारतात फसवणुकीने कमावले १५ कोटी रुपये !


आगरा – सामाजिक माध्यमांद्वारे विविध वस्तू स्वस्तात विकण्याचे आमीष दाखवून मोठी फसवणूक करणार्‍या दक्षिण आफ्रिकेतील कॅमेरून देशाच्या २ विदेशी तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. ‘दोघेही मित्र असून विदेशी मुलांना भारतात शिक्षण घेण्यासाठी देण्यात येणार्‍या ‘स्टडी व्हिसा’वर भारतात आले होते’, असे पोलिसांनी सांगितले.

अकुंबे बोमा आणि मायकेल बुनेवा अशी या दोघांची नावे असून ते नोएडा येथे रहात होते. या दोघांनी मिळून अनेकांची सुमारे १५ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे.

आगरा येथील एका व्यावसायिकाच्या तक्रारीवरून या दोन्ही विदेशी तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळ ऑडी कार, लॅपटॉप, भ्रमणभाष आदी साहित्य सापडले. ते सामाजिक माध्यमांवर स्वस्त दरात वस्तू विकण्याचे नाटक करायचे. यानंतर ते निरपराध लोकांना आपला शिकार बनवायचे.