INC Manifesto : (म्हणे) ‘३० लाख युवकांना नोकरी देणार !’ – काँग्रेस
काँग्रेसच्या घोेषणापत्रातून जनतेला फुकाचे आश्वासन
नवी देहली – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने ५ एप्रिल या दिवशी निवडणूक घोषणापत्र प्रसिद्ध केले. या घोषणापत्रात मजूर, महिला, शिक्षण, शेतकरी आदींसाठी विविध आश्वासनांची खैरात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे तब्बल ३० लाख युवकांना नोकर्या उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. देहलीत आयोजित पत्रकार परिषदेत हे घोषणापत्र प्रसिद्ध करण्यात आले. या वेळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेे, राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यासह विविध नेते उपस्थित होते.
सौजन्य : एबीपी न्यूज वेब डेस्क
काँग्रेसच्या घोषणापत्रातील काही आश्वासने
१. ३० लाख युवकांना सरकारी नोकरी देणार
२. आरक्षणाची मर्यादा वाढवणार
३. सरकारी नोकर्यांमधील कत्रांटी धोरण रहित करणार
४. गरीब महिलांना वर्षाला १ लाख रुपये देणार
५. शेतकर्यांसाठी स्वामीनाथन् आयोगाच्या धर्तीवर किमान आधार मूल्य देणार
६. शेतकर्यांच्या आवश्यकतांच्या सर्व गोष्टींवरील ‘वस्तू आणि सेवा कर’ हटवणार
७. असंघटित कामगारांसाठी दुर्घटना वीमा योजना आणणार
८. गॅस सिलिंडर, तसेच पेट्रोल आणि डिझेल यांचे दर कमी करणार
संपादकीय भूमिकाकाँग्रेसने या देशावर ६ दशकांहून अधिक काळ राज्य केले. त्या काळात सर्वंकष स्तरांवर देशाची अतोनात हानी केली. सत्तेत असतांना तिने बेरोजगारी का अल्प केली नाही ? त्यामुळे आता तिने काहीही देण्याचे आश्वासन दिले, तरी जनतेचा विश्वास तिने कायमचाच गमावल्याने जनता तिला घरचाच रस्ता दाखवणार ! |