‘जय श्रीराम’ न म्हणता ‘जय सीताराम’ म्हणा ! – मुख्यमंत्री सिद्धरामय्या, कर्नाटक

कर्नाटकातील काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे हिंदूंना आवाहन !

मुख्यमंत्री सिद्धरामय्या

चित्रदुर्ग (कर्नाटक) – रामाचा परिवार होता. सीता, लक्ष्मण यांना सोडून एकट्या रामासाठी देवालय बांधून ‘जय श्रीराम’ असे म्हणतात. श्रीराम, सीता सगळे एकच ! म्हणूनच मी ‘जय सीताराम’, असे म्हणतो. तुम्हीही सर्वजण ‘जय सीताराम’ असेच म्हणा, असे आवाहन कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी येथे आयोजित प्रचारसभेत हिंदूंना केले.

संपादकीय भूमिका 

काँग्रेसवाले ‘जय सीताराम’ तरी म्हणण्याचे मान्य करतात, हेही नसे थोडके !