पुणे येथे धर्मांधांनी केलेल्या मारहाणीमध्ये हिंदु महिलेच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू !
धर्मांध आरोपीसह घरच्यांवर गुन्हा नोंद; आरोपीला अटक !
पुणे – येथील मंगळवार पेठेतील ‘यारखान कॉम्प्लेक्स’मध्ये वास्तव्य करणार्या मीरा चित्रावार या गरोदर हिंदु महिलेवर धर्मांधांनी आक्रमण करून तिच्या पोटावर लाथा-बुक्के मारले. यामुळे तिच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी नवाज खान याला अटक केली आहे. तसेच रफिया खान, नासिर खान आणि सलमान उपाख्य टिपू शेख या चौघांच्या विरोधात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही घटना २ एप्रिल या दिवशी घडली. या मारहाणीची तक्रार राजू चित्रावार यांनी केली आहे.
नवाज खान याने २७ मार्च या दिवशी राजू यांच्या दारावर लाथ मारली होती. त्याचा जाब विचारण्यासाठी तक्रारदार राजू, त्याची पत्नी मीरा आणि गणेश कांबळे गेले होते. तेव्हा नवाज खान आणि त्याचे कुटुंबीय यांंनी त्यांना मारहाण केली. सलमान याने राजू चित्रावार यांना भ्रमणभाष करून ‘पोलिसामध्ये तक्रार प्रविष्ट केलीस, तर तुला जिवे मारीन’ अशी धमकी दिल्याचे तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे. गरोदर अवस्थेमध्ये पोटात मार बसल्याने मीरा यांना रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेण्यात आले; मात्र त्यांच्या पोटातील अर्भकाचा उपचाराच्या वेळी मृत्यू झाला. त्यानंतर संतप्त नातेवाईक आणि हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपींवर गुन्हा नोंद करण्याची मागणी केली.
अर्भक मरावे म्हणून उद्दामपणे मारहाण !मीरा चित्रावार या गरोदर आहेत, हे ठाऊक असूनही त्यांच्या पोटावर लाथा मारून मारहाण केली. तिच्या पोटातील अर्भक मरू शकते, याची जाणीव असतांनाही आरोपींनी जाणीवपूर्वक मारहाण केले, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. |
संपादकीय भूमिकाहिंदूबहुल देशांत धर्मांधांचा वाढता उद्दामपणा जाणा ! जाणीवपूर्वक केलेल्या मारहाणीमागची धर्मांधांची द्वेषपूर्ण मानसिकता ही धोक्याची घंटा ! या धर्मांधांवर बालहत्येचा गुन्हा नोंद करून त्यांना कडक शिक्षा केली पाहिजे ! |