मतदान केंद्रांवरील सुविधांविषयी विशेष भर द्या ! – उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड
लोकसभा निवडणूक – २०२४
रत्नागिरी – मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधाविषयी विशेष भर द्यावा. ज्या ठिकाणी दुरुस्तीची आवश्यकता आहे, ते प्राधान्याने पूर्ण करावे, अशी सूचना उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात निश्चित किमान सुविधा (ए.एम्.एफ्.) विषयी आढावा बैठक झाली. या बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे आणि अन्य शासकीय अधिकारी उपस्थित होते. उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. ‘मतदान केंद्रांवर वीज, आवश्यक फर्निचर, पंखे, रॅम्प, स्वच्छतागृहे सुस्थितीत असावीत. पिण्याच्या पाण्याची सोय ठेवावी. शिक्षणाधिकार्यांनी प्रशिक्षणाविषयी आदेशाची बजावणी करावी’, असे ते म्हणाले.