संशयित आरोपी फहाद शेख याची जामिनावर मुक्तता
रत्नागिरीत अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याचे प्रकरण
रत्नागिरी – येथील शहर बसस्थानकात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्या प्रकरणी संशयित धर्मांध फहाद नुरूद्दीन शेख याला न्यायालयाने ५० सहस्र रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली आहे. त्याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम ३५४ आणि ‘पॉक्सो’ कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘१६ सप्टेंबर २०२३ या दिवशी पीडित अल्पवयीन मुलगी ही शहर बसस्थानक येथे उभी होती. या वेळी संशयित आरोपी फहाद हा त्या ठिकाणी आला. फहाद याने पीडितेची ओढणी ओढून तिच्याशी गैरवर्तन केले’, अशी तक्रार पीडितेने शहर पोलिसांत प्रविष्ट (दाखल) केली होती. त्यानुसार पोलिसांनी फहाद याच्याविरूद्ध गुन्हा नोंद करत त्याला अटक केली. दरम्यान फहाद याच्या वतीने जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज प्रविष्ट केला होता. रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांनी जामीन अर्जावर निकाल दिला.